परिचय

 

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्याच नाही तर अखील भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे.त्यांनी पारतंत्र्यातून  स्वातं त्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडविले आणि फार मोठा आदर्श निर्मान केला.कोणत्याही कार्याचा आरंभ लहानश्या मर्यादेत होतो आणि पुढे ते कार्य मोठ्या मर्यादेत गेलेले आढळते. पवित्र गंगेचा उगम आणि पुढे तिचा झालेला विस्तार हे उदाहरण या दृष्टीने ल्काहात घेण्या सारखे नाही कां ? तर शिवाजी महाराजांचे कार्य जरी आरंभी महाराष्ट्राच्या परतंत्रे विषयीचा विरोध प्रगट करून स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नान पुरता मर्यादित वाटला तरी लोकांच्या मनात जी स्वातंत्र्यप्रेमाची ज्योत पेटली त्यामुळेच पुढे भारतात द्क्षिणोत्तर ती प्रेरणा निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एक दैवी चमत्कारच होता.  त्यांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवराव या निजामशाहीतील शूर सरदाराची मुलगी तर वडील शहाजीराजे भोसले हे स्वकर्तुत्वाने सामर्थवान बनलेल्या मालोजीराव भोसले यांचे चिरंजीव राजकारणात मुरलेल्या व स्वातंत्र्याचा उन्मेष बाळगणार्या माता -पित्याच्या पोटी शिवाजीचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या वर्षी वैशाख शुद्ध द्वितीयेस जुन्नर जवळ शिवनेरी या किल्ल्यावर झाला.

तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी सत्ता संप्विनार्या परधर्मी परकीय सत्ताधीशांनी महाराष्ट्रावर पुढे दोन तीनशे वर्षे सत्ता गाजविली. जसजशी त्यांची सत्ता मजबूत होत गेली तसतशी त्यांच्यातली जुलमी प्रवृत्ती वाढीला लागली. आपल्या प्रजेवर अन्यायाचे कर लादणे, त्यांची घरेदारे आणि जमिनी ब्ल्काव्ने, स्त्रियांची अब्रू लुटणे, आणि गुलाम म्हणून प्रजेला राबविणे. असे प्रकार सुरु झाले. सारी मराठी माण या जुलसेमी सत्तेवर रागावली होती.  पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तशी अवस्था झाली होती.